खळबळ : दिवसभरात दोघांचा मृत्यु ; 12 पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; आठ जणांना सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यात आज (दि. 15) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 15 झाली आहे. तर 24 तासात जिल्ह्यात पुन्हा 12 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात आठ जण प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे तर चार जण ॲन्टीजन रॅपीड टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या आठ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवारी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळातील तिरुपती नगर येथील 41 वर्षीय पुरुष आणि दिग्रस येथील विठ्ठल नगर रहिवासी 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 12 जणांमध्ये सात पुरुष आणि पाच महिला आहेत. यात दारव्हा येथील एक पुरुष व दोन महिला, दिग्रस येथील दोन पुरुष व दोन महिला, यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, पुसद येथील एक पुरुष आणि कळंब ग्रामीण येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 139 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यातील दोघांचा मृत्यु झाल्याने ही संख्या 137 झाली. यात आज (दि.15) रोजी 12 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 149 वर गेला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या आठ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 141 वर आली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 488 एवढी आहे. यापैकी 332 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 15 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 150 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 33 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 7304 नमुने पाठविले असून यापैकी 7231 प्राप्त तर 73 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6743 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..