प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्जाची मुदत 31 जुलै पर्यंत
महा-ई-सेवा केंद्राद्वारे अर्ज भरण्याची सुविधा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
: प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 खरीप हंगामाकरीता लागु करण्याबाबत शासनाने 29 जून 2020 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी 31 जुलै 2020 च्या आत प्रस्ताव सादर करायचा आहे.
अर्ज भरण्यासाठी बँकात होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून या हंगामापासून गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणून आपले सरकार केंद्राद्वारे म्हणजेच महाईसेवा केंद्रावर विमा अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच www.pmfby.gov.in या पोर्टलवर थेट अर्ज करता येतील.
पीक विमा करिता बाबनिहाय प्रति हेक्टर विमा संरक्षित रकम, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता (कंसात) पुढीलप्रमाणे आहे. खरीप ज्वारी करिता विमा संरक्षित रकम 25000 प्रति हेक्टर असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पीक विम्याच हप्ता 500 रुपये राहील. सोयाबीन रु. 40000( हप्ता रु.800), मुग 20000 (हप्ता रु.400), उडीद 20000 (हप्ता रु.400), तुर 35000 (हप्ता रु.700), कापूस 40000 (हप्ता रु.2000) याप्रमाणे पीक विमा हप्ता राहणार आहे.
शेतकऱ्यांना शेतमालाच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहीक स्वरुपात मिळावी या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. प्रतिकुल हवामानामुळे घटकांवर पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा विमा संरक्षणात समावेष आहे.
खरीप हंगाम 2020-21 पासून योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेत सादर करतेवळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टे करार असलेल्या शेतकऱ्याचा करारनामा किंवा सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र, तसेच आधार कार्ड यांची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र,किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉब कार्ड किंवा वानचालक परवाना यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत कळवावी. सदर माहिती विमा कंपनीशी संबंधीत बँक, कृषी विभाग, महसूल विभाग किंवा इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, सहावा मजला, सुयोग प्लॅटीनम, मंगलदास रोड, पुणे-411001, दुरध्वनी क्रमांक 020-67278900 टोल फ्री क्रमांक 1800 103 5499, ई-मेल संपर्क agrimh@iffcotokio.co.in या पत्त्यावर कळविण्यात यावी.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.एम.कोळपकर यांनी कळविले आहे.
०००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..