एकरक्कमी बिल भरणाऱ्याना 2 टक्के सूट तर मागणी केल्यास देयकाचे तीन हप्ते करून देऊ:ऊर्जामंत्री नितीन राऊत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
वाढीव वीज देयकांवरून गोंधळ सुरू असताना ग्राहकांनी मागणी केल्यास वीज देयकाचे समान तीन हप्ते करून देण्यात येतील आणि एकरकमी वीज देयक भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी जाहीर केले.
टाळेबंदीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणसह सर्वच वीज वितरण कंपन्यांना वीज मीटर वाचन न करता एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने केली होती. जूनमध्ये टाळेबंदीत शिथिलता दिल्याने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने वीज मीटर वाचन करून प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीज देयके देण्यात आली.टाळेबंदीच्या काळात दिलेली सरासरी वीज देयके ही हिवाळ्यातील वीजवापरावर दिलेली आहेत आणि घरगुती ग्राहक उन्हाळ्यात टाळेबंदीमुळे घरी राहिल्याने त्यांच्या वीजवापरात मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. त्यामुळे जूनमधील वीज देयकांत ते समाविष्ट झाले, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….