तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
“कोण कोणाच्या पाया पडतं हे पाहणारे थोरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात थांबून काय करत होते? भ्रष्टाचाराच्या फाइल काढू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजपमध्ये घ्या म्हणून विनवणी करत होते, यावरही त्यांनी बोललं पाहिजे, असं म्हणत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्री बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा राधाकृष्ण विखे पाटलांनी जोरदार समाचार घेतलाय. नेहरू, गांधींचे विचार सोडून काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना मातोश्रीच्या दारात जावं लागतं हीच मोठी शोकांतिका आहे, अशी टीका विखेंनी केली आहे.
थोरातांचं पक्षात काय स्थान आहे याबद्दल न बोललंच बरं, मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळालं.आता मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांची धडपड आहे, असंही राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय.
राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला आठ आठ दिवस मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हेच मोठं दुर्दैव असल्याकडे लक्ष वेधून एवढी लाचारी पत्करून सत्तेत का राहता, सत्तेत आम्हाला स्थान राहू द्या यासाठीच आता मातोश्रीवर वाऱ्या सुरू आहेत, असा घणाघात विखेंनी केला आहे.