राष्ट्रहितासाठी भाजपा ठाकरे सरकारला पाठिंबा देईल; भाजपा नेत्याचं महत्वाचं विधान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यानं मोठं विधान करत राजकीय खळबळ उडवली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत भाजपा शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो असे म्हटले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे सरकारचे समर्थन काढल्यास अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्वातील ठाकरे सरकराला भाजपाने पाठिंबा द्यावा. आणि राज्यात स्थिर सरकार द्यावं.स्वामी म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं समर्थन माघारी घेतलं.त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यापेक्षा राष्ट्रहिताचा विचार करून भाजपाने शिवसेनेला पाठिंबा द्यावा. शिवेसेनाला पाठिंबा देऊन एनडीएचं स्थिर सरकार स्थापन करावं.
महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज –
महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. मात्र, काही प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, थोरात आणि चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली आहे. या चर्चेनंतर काँग्रेसमधील नाराजी दूर झाली. आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच सरकारवर वर्चस्व आहे. काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही, असा सर्वच मंत्र्यांचा आक्षेपाचा मुद्दा होता. काँग्रेसची काही ध्येय-धोरणे आहेत, विचारधारा आहे, त्याला सरकारमध्ये काही स्थान आहे का, असा प्रश्न काही मंत्र्यांनी उपस्थित केला होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….