मोठी बातमी : यवतमाळ शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
गत तीन महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता. शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतांनाच आता पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नेताजी चौक येथील ४५ वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्तिला दोन – तीन दिवसांपासून ताप आणि खोकला आहे. तसेच त्याने सुरवातीला खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. या व्यक्तिच्या कुटुंबातील ९ सदस्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले असून हा व्यक्ती राहत असलेला शहरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नागरिकांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या सपंर्कात येऊ नये. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनावश्यकपणे नागरिकांनी बाहेर फिरू नये. साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
आज जिल्ह्यात कोरोनाचा आठवा बळी ः
यवतमाळ : एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्तिचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युची संख्या आठ झाली आहे. सदर व्यक्ती हा मूळचा अकोला येथील असून १४ जून रोजी तो येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता. १५ जून रोजी त्याला व्हेंटीलेटर लावण्यात आले. मात्र १७ जूनच्या रात्री १ वाजता त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.