अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरण : त्याला आवाज ऐकू यायचे, माणसं दिसायची. त्यामुळेच घाबरुन रिया त्याला सोडून गेली”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता असा अल्पावधीतच लौकिक मिळवलेल्या सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी साडेचार वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आगामी प्रोजेक्टसाठी सुशांतने महेश भट्ट यांची भेट घेतली होती. त्याचवेळी सुशांतला भेटलेल्या भट्ट यांच्या सहकारी आणि लेखिका सुहरिता सेनगुप्ता यांनी काही सुशांतचा मानसिक आजार हाताळण्याबाहेर गेला होता असं म्हटलं आहे. मागील काही काळापासून सुशांतची मानसिक स्थिती कशी खालावत गेली यासंदर्भात सुहरिता यांनी माहिती दिली आहे.यासंदर्भातील वृत्त नॅश्नल हेरॉल्ड इंडियाने दिलं आहे.
सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर गेला
“सडक २ मधील भूमिकेसंदर्भात बोलण्यासाठी सुशांत आणि भट्ट यांची भेट झाली होती. भेटीदरम्यान अवघ्या काही मिनिटांमध्येच दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु झाल्या. सुशांत खूप बोलका होता. तो अगदी फिजिक्सपासून ते चित्रपटांपर्यंत कोणत्याही विषयांवर सहज बोलायचा,” असं सेनगुप्ता म्हणाल्या. मात्र सुशांतच्या बोलण्यात सतत झळकणारी उदासीनता भट्ट यांच्या नजरेतून सुटली नाही. “सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर चालला आहे हे त्यांनी ओळखलं. मात्र औषधांशिवाय यावर काहीच उपचार नाही हे ही ठाऊक होतं. निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने (चक्रवर्ती) अनेकदा केला. सुशांतने औषध वेळेवर घ्यावीत योग्य उपचार घ्यावेत यासाठी सतत ती त्याच्या मागे लागायची. मात्र त्याने औषधं घेणं बंद केलं होतं,” असंही सेनगुप्ता यांनी सांगितलं.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…