नांदेड ऑनलाईन शेतकरी मेळावा ; राज्यातील सरकारला कोरोना झालाय – आ.सदाभाऊ खोत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड –
टाळेबंदी मुळे शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून विविध अडचणीला सामोरे जात आहे. खरीप हंगाम सुरू होऊन सुद्धा सरकारचं शेतकऱ्याबद्दल धोरण उदासीन आहे, सरकारला कोरोना झालाय अशी सडकून टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कोरोना महामारीने संपूर्ण राज्यात टाळेबंदी असल्यामुळे नवंतंत्रज्ञानाचा उपयोग करून रयत क्रांती संघटना नांदेड जिल्हा आयोजित राज्यातील पहिला ऑनलाइन शेतकरी मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले गेली अनेक वर्ष शेतकऱ्याच्या पायात कायद्याच्या बेड्या होत्या त्या मुक्त करण्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत. ७५ वर्ष जुना कायद्यात बदल करण्यात आला.अत्यावशक कायदा मधून कांदा, बटाटा ,कडधान्य, तेलबिया वगळण्यात आले आहे. आणि एक देश एक बाजार या धोरणाला मंजुरी देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र करण्याकडे मोदी सरकारची वाट चालू आहे त्याबद्दल आम्ही रयत क्रांती संघटनेच्यावतीने ११ जून रोजी संपूर्ण राज्यात विजयोत्सव साजरा केला व मोदी सरकारचे अभिनंदन केले.
या कायद्यामुळे शेतकरी आपला माल देशातील कोणत्याही बाजरामध्ये मुक्तपणे विकू शकतो. अत्यावश्यक कायद्यातून जे शेतमाल वगळण्यात आलेत ते बाजार भावानुसार तो विकू शकेत त्याचा साठा करू शकेल यामध्ये भाव वाढला तर सरकार हस्तक्षेप करणार नाही ,त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मागणीनुसार भाव मिळेल व व त्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.
ह्या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करायचे असते त्यांनी जर केलं नाही तर आम्ही गप्प बसणार नाही कारण यासाठी अनेक पिढ्या बरबाद झाल्यात व अनेक शेतकरी चळवळीत रक्त सांडले आहे ते आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करू व सरकारवर दबाव टाकू आणि कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करू घेऊ असे खोत यांनी सांगितले. ज्या दिवशी अंमलबजावणी होईल तो दिवस शेतकऱ्यांचे पंचप्राण स्व.शरद जोशी साहेबांना खरी श्रद्धांजली होईल कारण त्यानी प्रथम चळवळीत मांडणी केली होती.
शेतकऱ्याच्या घरात आजही कापूस व हरभरा पडून आहे त्याची खरेदी नाही. टाळेबंदीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबद्दल सरकारने काहीच मदत जाहीर केली नाही. खरीप हंगाम सुरू झालाय पीक कर्ज उपलब्ध नाही, बाजरात बी-बियाणे,खताची अपुरा साठा आहे, कर्ज माफीचा बोजवारा उठला आहे, या काळात सरकारचे कोणतेही नियोजन दिसत नाही, शेतकरी कोणाकडे दाद मागावे या चिंतेत आहे असे खोत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांना मदत जाहीर होती ती अद्याप सहा महिने झाले शेतकऱ्याला मिळाली नाही. जिल्ह्यातील काही गावे यातून वगळले आहेत, पीक विम्याची रक्कम तुटपुंजी मिळाली आहे. सोयाबीनची एक बॅग ५००₹ रुपयांनी महाग झाली आहे, खताच्या किमतीमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज अजून उपलब्ध झाले नाही अशा अनेक अडचणी ला नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी सामोरे जात आहे सरकारला या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही शेतकऱ्यांच्या धोरणावर हे सरकार अपयशी ठरले आहे. वेळीच यात सरकारने लक्ष द्यावे नाहीतर टाळेबंदीचे सर्व नियम बाजूला करून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊ अशा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी दिला.