सावधान : करोनाची आणखी दोन नवी लक्षणे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भारतामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. देशात समुह संपर्काला सुरूवात होऊ शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. करोनावर सर्वच देशात संशोधन सुरू आहे. रुप बदलणाऱ्या करोनाची लक्षणंही बदलताना दिसून येत आहेत किंवा नव्यानं समोर येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या लक्षणांमध्ये आणखी दोन लक्षणांचा समावेश केला आहे. अचानक वास व चव या दोन संवेदना नाहीशा झाल्या असतील तर व्यक्तीला करोनाची बाधा झालेली असू शकते.
करोनाची चाचणी करण्यासाठीच्या निकषांमध्ये अचानक तोंडाची चव जाणं, गंधाची जाणीव जाणं या लक्षणांचाही आता समावेश करण्यात आला आहे. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे वा दुखणे, थकवा येणे, नाक गळणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी करोनाची लक्षणे मानली जातात.गंभीर स्वरुपाची लक्षणं न आढळणारे अनेक रुग्ण भारतात आढळले आहेत. परंतु, त्यांची करोना चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली. अशा रुग्णांना ‘असिम्प्टमॅटिक’ अर्थात कोणतीही लक्षणं नसलेला रुग्ण म्हणून ओळखलं जातं.
देशात करोना रुग्णांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ इतकी झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक नव्या रुग्णांची भर पडली असून शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ४५८ रुग्ण आढळले. दिल्लीतही चोवीस तासांमध्ये आणखी २ हजार रुग्ण वाढले. भारत आता करोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही करोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये करोना रुग्णांचे मृत्यू ३८६ झाले असून सलग तिसऱ्या दिवशी तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यू ८ हजार ८८४ झाले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….