स्कायमेट अलर्ट : यवतमाळ वाशीम जिल्ह्यासह १५ जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचत आहे. दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्कायमेटने दिलेल्या अलर्टनुसार अकोला, औरंगाबाद, भंडारा, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, नंदूरबार, नाशिक, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ
या पंधरा ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस होईल.
मान्सून तळकोकणात सक्रिय झाला असून आता शनिवारपासून म्हणजे कालपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मुंबईत येत्या १३ आणि १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.या दरम्यान मान्सूनच्या येण्याने शेतकरी आनंदात आहेत. मान्सून येण्याच्या दिवशीही मराठवाडा, नांदेड, हिंगोली, मुंबई आणि ठाणे या भागात मुसळधार पाऊस झाला होता.