पंतप्रधान करणार बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जनजीवन सुरळीत करण्यासाठी टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर देशभर करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना हाताळणीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे चर्चा करणार आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजता मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. देशभरातील विविध राज्यांत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे करोना हाताळणीत आणखी काय करण्याची गरज आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १६ व १७ जून रोजी चर्चा करणार आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता, राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव हे या चर्चेत सहभागी होतील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..