खळबळ : आणखी दोन पॉझिटिव्ह महागाव आणि उमरखेड तालुक्यातील प्रत्येकी १ कोरोना रुग्ण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव (update स.८ ) :
महागाव तालुक्यातील साधूनगर येथील कोरोना बाधित आणि नंतर मृत पावलेल्या सराफा व्यावसायिकाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या एका सराफा कारागिराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या एका रुग्णाचा कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आज यवतमाळ जिल्ह्यातून २ कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महागाव आणि उमरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.महागाव तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह संख्याबळ १२ वर पोहचली असून एक मृत्यू आहे.
जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात काल मंगळवारला एकूण ११० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २ पॉझिटिव्ह आणि उर्वरित १०८ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६० वर पोहचला आहें. यापैकी १२३ झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. तर आजपर्यंत
दोन कोरोना बाधित रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू प्रशासनाने कळविले आहे.
………………….
यवतमाळ (update २:१७):
दहा रिपोर्ट निगेटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले 10 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यात दिग्रस येथील एक, महागाव येथील एक आणि वैद्यकीय महाविद्यालय येथील आठ रिपोर्टचा समावेश आहे. तसेच निगेटिव्ह आलेल्यांमध्ये एक सारीचा रुग्ण असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.