महागाव कोविड केयर सेंटरचे’भारुड’ कर्तव्यावर आसलेले दोन नोडल अधिकारी तथा पोलीस कार्यवाहिच्या कचाटयात?
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
महागाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये कोरेनटाईन असलेल्या संशयित रुग्णांनी स्वतःला स्वस्त राहण्यासाठी डान्स काय केला तर सध्या आभाळ कोसळल्याची स्थिती महागाव पासून ते मुंबई पर्यंत निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अनेकांना सेंटरमध्ये भरती केल्यानंतर अनेकांचे चेहरे पडले होते आता आपलं काही खरं नाही अशा स्थितीमध्ये अनेकजण कोमात गेले त्यापैकी मन अस्वस्थ असलेल्या तरुणाकडून नैराश्य पत्करलेल्या तरुणांना वैफल्यातून बाहेर काढण्यासाठी मोबाईलच्या गाण्यावर ठेका धरला योगायोग आसा त्याचवेळी त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता ही वार्ता समजताच त्यांच्या आनंदात अधिकच भर पडली आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रुग्णांनी मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी असले प्रयोग करावे हे असे निर्देश दिलेले आहेत यापेक्षा वेगळं काही महागाव येथील संशयित रुग्णांनी केलेले नाही . परंतु काही अतिउत्साही लोकांमुळे महागाव येथील केअर सेंटर मध्ये ज्या आरोग्य विभागाने रात्रंदिवस एक करून जी मेहनत केली त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
प्रसिद्धी माध्यमाच्या आतताई पणामुळे केअर सेंटर मध्ये प्रत्यक्ष काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी पूर्णतः मनातून खचले आहेत वास्तविक पाहता गेल्या दोन महिन्यापासून आरोग्य विभाग शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय सतर्कते पणे काम करत आहे संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य विभाग आशा वर्कर रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत दरम्यान शहरांमध्ये पॉझिटिव पेशंट निघाल्यानंतर एकच धावपळ उडाली त्यांच्या संपर्कात असलेले कॉन्टॅक्ट शोधून काढताना आरोग्य विभागाचे बरीच दमछाक झाली 50 ते 60 लोकांना केअर सेंटर मध्ये भरती करण्यात आली एवढ्या लोकांची जेवण चहा पाण्याची व्यवस्था करणे तसेही तात्काळ शक्य नव्हते केअर सेंटरला कोणीही सर्विस द्यायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जब्बार पठाण यांनी पुरवठा धारकांना तयार करून जेवणाची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली राहिला प्रश्न स्वच्छतेचा स्वच्छता करण्यासाठी स्वीपर चे काम करायला कोणीही तयार नाही .काही दिवस तर केअर सेंटर इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर कोणी जायला तयार नव्हते अशावेळी स्वतः डॉक्टर जब्बार पठाण आणि त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाण्याचे बॅरल वरच्या मजल्यावर नेऊन दिले एकीकडे आरोग्य विभाग रुग्णांचे आरोग्य सांभाळण्यासाठी जिवाचे रान करत असताना त्याच दरम्यान जेवणाची आणि स्वच्छतेचा अभाव असल्याचे हूल उठवण्यात आली तेवढ्याच एका गोष्टीचा प्रचंड बाऊ करण्यात आला. हा राग प्रशासनाच्या मनामध्ये होतात त्याचवेळी संशयित रुग्णांनी सैराट च्या गाण्यावर ठेका धरला आणि हा ठेका इतका महाग पडला की शेवटी जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
केअर सेंटर मध्ये डान्स करणारे संशयित रुग्ण यांच्या व्यतिरिक्त अन्य महिला-पुरुष भरती आहेत त्यांच्याकडून कोणत्याही तक्रारी नाहीत नृत्य करणाऱ्यांनी ओली पार्टी केल्याची चर्चा गावभर पसरवण्यात आली आहे घरूनच जेवणाचे डबे बोलावण्यात आले होते त्या डब्यांमधून मटन आणि कपड्यांमध्ये दारू गुंडाळून आणण्यात आली होती असे सांगितले जात आहे ते जर खरे असेल तर ही अतिशय गंभीर बाब मानली पाहिजे. केअर सेंटरला आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी महसूल प्रशासनाचे नोडल अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त कार्यरत असताना केअर सेंटरच्या इमारती मध्ये तिसऱ्या मजल्यावर दारू मटण पोचले कसे ? हा संशोधनाचा विषय आहे.
केअर सेंटर मधील संशयित रुग्णांनी ओली पार्टी केली आहे असे थोडावेळ गृहीत धरले तरी मग स्थानिक प्रशासन काय गोळ्या खेळत होते का हा प्रश्न पडतो ज्या संशयित रुग्णावर ओल्या पार्टी चा आरोप केल्या जात आहे त्यांची अंगझडती का घेण्यात आली नाही त्यांची मेडिकल का करण्यात आली नाही. असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. ज्यांच्यावर हा आरोप करण्यात आला ते काही सराईत नाहीत समाजामध्ये प्रतिष्ठा असलेले व्यापारी आहेत याचे भान कोणीही ठेवलेले नाही. तालुका व्यवस्थापन समितीचे प्रमुख तहसीलदार यांचा अन्य प्रशासनासोबत समन्वय नाही शहरांमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घराघरात अवैद्य दारू गुटका याची सर्रास विक्री सुरू आहे त्यामधून जमणारी गर्दी आणि असलेला संसर्गजन्य रोग किती लोकांच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलेला आहे याची कल्पना न केलेली बरी याला जबाबदार स्थानिक प्रशासनच आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही . शहरांमध्ये बहुतांश प्रभागात कंटेनमेंट वार्ड तयार करण्यात आले आहे त्यापैकी प्रभाग क्रमांक सात मध्ये केअर स