जिल्ह्यात आणखी एक पॉझेटिव्ह तर एकाला सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
महागाव येथील कारोनाबाधित मृतकाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाने भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णाला कोव्हीड केअर सेंटर येथून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34 झाली होती. मात्र भरती असलेला एक जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्हचा आकडा पुन्हा 33 झाला आहे.
गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 86 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह तर उर्वरीत 85 निगेटिव्ह आहेत. मंगळवारी महाविद्यालयाने 113 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2552 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 2491 प्राप्त आहेत. 61 नमुन्यांचे रिपोर्ट अद्यापही अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 158 वर गेली आहे. यात सद्यस्थितीत भरती असलेले 33 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह, उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेले 123 तर दोन मृतकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून 2333 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….