“अर्ज मागे घेणार नाही , निवडणुक लढवणारच” ; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी तरी ही संजय गायकवाड ठाम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे. मात्र, त्यांचं नाव जाहीर होण्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे घेतील, असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत. मात्र, आपण अर्ज मागे घेणार नसल्याची एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. मी बंड केलेलं नाही, मात्र मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. 4 तारखेनंतर कळेल काय होतं, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून मी नामांकन दाखल केलं, तूर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. चार तारखेनंतर काय होतं ते कळेल, असंही ते म्हणाले आहेत. पक्षाकडून लोकसभेची यादी जाहीर होण्यापूर्वीच संजय गायकवाडांनी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशातच आता पुन्हा एकदा आपण निवडणूक लढणार असल्याचा निर्धार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मी बंड केलेलं नाही, असाही पुनरुच्चार संजय गायकवाड यांनी बोलताना केला आहे.
लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे केलेला नाही : संजय गायकवाड
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड बोलताना म्हणाले की, “मी निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं अर्ज दाखल केला आहे. लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे दाखल केलेला नाही. काल (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा पहिला दिवस होता. मी आधीपासूनच ठरवलेलं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं. फक्त दरवेळी मी पाच-पन्नास हजार लोकं सोबत घेऊन जातो आणि उमेदवारी अर्ज दाखल करतो. यावेळी फक्त पाचचजणांसोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.”
मी निवडणूक लढवण्यावर ठाम : संजय गायकवाड
“जे समाजात काम करत नाही, ज्यांना लोकं ओळखत नाहीत, असे लोक निवडणुकीची तयारी करतात. मी चोवीस तास लोकांसाठी काम करत असतो. राज्यभर काम करतो. त्यामुळे मी चोवीस तास तयारी करत असतो.”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, “माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत अद्याप काहीच ठरलेलं नाही. प्रतापराव जाधव आणि माझी जी भेट झाली, त्यामध्ये याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. अजूनतरी माझा अर्ज कायम आहे. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. येणाऱ्या काळात दिसेलच सर्वांना. तुम्हीही आहात आणि आम्हीही आहोत.”

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..