मंत्रिमंडळाचा निर्णय : मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमणार हसन मुश्रीफ ;आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना मिळणार 1हजार प्रोत्साहनपर भत्ता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
त्याचबरोबर कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची यावेळी घोषणा करण्यात आली. याचा लाभ राज्यातील १३,५०० आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर यांना मिळणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता वितरितही करण्यात आला आहे. दरम्यान, करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन मिळणार असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..