ढाणकी येथील दारू दुकानाचा परवाना अद्यापही रद्द नाही दारू दुकानाचा परवाना रद्द करण्याची वारसदारांची मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत :९४२२८६७७४८
उमरखेडः
तालुक्यातील ढाणकी येथील हंसराज ट्रेडर्स या देशी दारू दुकानातून पुसद राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या चौकशीदरम्यान 18 मे रोजी एकाच दिवशी तीनशे ते साडेतीनशे पेट्यांची तफावत आढळली असता त्यांनी विभागीय प्रकरण नोंद केले जिल्हाधिकारी यांच्या नियमाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन काळात चढ्या दराने अवैध दारूविक्री करण्यात आल्याने हा परवाना रद्द करण्याची परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागीय अधीक्षक यांनी सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांना पाठवले नसल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात बसल्याची बोलल्या जात आहे
मे हंसराज ट्रेडर्स दुकानाचे वारस श्रीमती मिराबाई नारायण नाईक यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तक्रार दरम्यान सांगितले की मे हंसराज ट्रेडर्स या देशी दारू दुकानात विनोद कुमार पन्नालाल जयस्वाल यास मागील सतत तीन वर्षांपासून हे दुकान भाडेतत्वावर देण्यात आली आहे विनोदकुमार हा नागपूर येथील रहिवासी असून तो नागपूर येथून बनावट देशी दारू आणून या cl3 मध्ये स्वतःच्या लालसेपोटी जास्त दराने विक्री करत असतो बनावट दारू ही ग्राहकांच्या आरोग्यास धोकादायक आहे व सि एल 3 परवान्याचे आम्ही कायदेशीर वारस आहोत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्हाला वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या बातम्या पासून मानसिक त्रास होत आहे त्यामुळे सदर मे हंसराज ट्रेडर्स सी एल 3 परवाना क्रमांक 49/ 20 -21 कायमस्वरूपी बंद करण्यात यावा व आम्हास योग्य न्याय द्यावा अशी मागणी वारसांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केली आहे
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी या परवान धारका विषय का कारवाई करत नाही असा सवाल ढाणकी परिसरातील जनतेच्या मनात घर करत आहे अधीक्षक सुरेंद्र मनपिया हे नागपूर येथील रहिवासी असल्याने त्यांचे आणि भाडेतत्त्वावर दारू दुकान चालवत असलेले विनोद कुमार पन्नालाल जयस्वाल नागपूर येथील रहिवासी असल्याने यांचे काहीतरी संबंध असल्यामुळे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे परवानाधारकाला दंडात्मक कारवाई न करता परवाना रद्द होईल का याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे
मे हंसराज ट्रेडर्स दुकान विषयक त्वरित निर्णय लावा अशी मागणी आमदार नामदेव ससाने यांनी फोनद्वारे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मंनपिया यांना केली व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा हा विषय अधिवेशनात मांडला जाईल
मागणी मान्य न झाल्यास आम्ही परत यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना इच्छामरणाची मागणी करू
श्रीमती मीराबाई नारायण नाईक राठोड
दारू परवाना वारसदार ढाणकी