गाव बंदी करणाऱ्या मराठा बांधवांना प्रणिती शिंदेनी सुनवलं ; ठेवलं चुकीवर बोट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- “लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने प्रचारात उडी घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे अनेक नेत्यांना याचा फटका बसत असून आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे. यावर आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नेत्यांना गावबंदी करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांना घरबंदी करणे गरजेचे आहे. भाजपने आरक्षणाच्या प्रश्नावरून खेळी केली आहे. त्यामुळे त्यांना उघडं पाडण्यासाठी येत्या निवडणुकीत घरबंदी करणे गरजेचे आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडली.
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रणिती शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील गावभेटी दौऱ्यात होते. यावेळी तालुक्यातील कौठाळी येथे मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत त्यांच्या गाठीभेटीत गोंधळ घातला. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी गावबंदी नको तर भाजपच्या नेत्यांना घरबंदी करा, असे विधान केले.
गावबंदी करू नका, हायकोर्टाचा आदेश
परळी येथे मनोज जरांगे यांच्या मराठा समाज महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानी दिले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन करु नये, तसेच चिथावणीखोर भाषणे देऊ नये असंही खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे यासह सगे सोयरे आणि इतर मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसले होते. त्यानंतरही सरकारकडून कुठलाही कृती कार्यक्रम अथवा अध्यादेश काढला जात नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..