खळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
: कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १० जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २५ वर पोहचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गुरुवारी रात्री २३ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १० पॉझेटिव्ह, १२ निगेटिव्ह आणि एक रिपोर्ट अचूक निदान नसल्याचे कळविण्यात आले आहे.
१० पॉझेटिव्ह रुग्णांपैकी ८ जण दिग्रस येथील तर २ जण पुसद येथील आहेत. हे सर्व जण पॉझेटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) आहेत. दिग्रस येथील सहा जण एकाच कुटुंबातील आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे.
जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या संकटाचा सामना अहोरात्र करीत आहे. मात्र असे असतांना दिग्रस येथे मुंबईवरून आलेल्या नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे सक्त आदेश असतांना त्यांनी कुटुंबासह पार्टी केली. यातून ते पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. त्यामुळे या सर्वांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे सक्त पालन करणे आपल्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. मुंबईवरून आलेल्या या नागरिकांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता २४ वर गेली असून एकूण पॉझेटिव्ह रुग्ण १२३ झाले आहेत. यापैकी ९९ जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.