चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस कडून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यंदा काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिला आहे.
त्यामुळं भाजपकडून पाच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.
तसेच राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे.