नगरपालिकेच्या मालमत्ताची सात जणांनी मिळून संगममताने रचलेला चोरीचा डाव फसला, गून्हा उघड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगर पालिकाचे बांधकाम विभाग प्रमुख गिरीश सुधाकर डूब्बेवार ने मालवाहक वाहन क्रमांक एम एच 29 ए एन 0014 चा चालक व मालक तसेच इतर चार इसम यांनी संगनमत करून गिरीश डूब्बेवार यांचे योजनेनुसार नगरपरिषद पुसद च्या कार्यालयातून अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीची मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अर्जदार मारोती किसनराव भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड पुसद यांनी केली असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
दिनांक 14/ 2 /2024 रोजी दुपारी अंदाजे दिड ते दोन वाजताचे दरम्यान ही घटना घडली. नगरपरिषद पुसदचा बांधकाम विभाग प्रमुख याने कार्यालयामध्ये चालू असलेल्या कामामधून आठ ते दहा लोखंडी खिडक्या ज्याची किंमत अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये आहे. ही सर्व मालमत्ता ईतर सहा जणांचे मदतीने मालवाहू पिवळा अपे क्रमांक एम एच 29 ए एन 0014 मध्ये टाकून डूबेवार यांनी घरी न्यावयास सांगितले. त्यानुसार सदर ऑटो मध्ये वरील मालमत्ता भरून ऑटो निघाला असता काही जागरूक नागरिकांनी याबाबत माहिती समजली असता त्यांनी अभिजीत वायकोस मुख्याधिकारी पुसद नगरपालिका पुसद यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती सांगितली. त्यावर उडवा उडवी चे उत्तरे दिली. आणि मुख्याधिकारीनी याला कडक भाषेत जाब विचारला असता डूब्बेवार याने चोरून नेलेली मालमत्ता आणून ठेवली.
परंतु नगरपरिषद पुसदच्या कार्यालयाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यांना कोणताही कार्यालयीन आदेश नव्हता असे असतानाही डूब्बेवार याचे सांगण्यावरून आणि त्याच्या या योजनेप्रमाणे नगरपरिषद पुसद ची सार्वजनिक मालमत्ता लुटून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा डाव फसल्यामुळे त्याने वरील मालमत्ता परत आणून ठेवली. या सर्व बाबीचे व्हिडिओ चित्रीकरण पुसद शहरातील अनेक नागरिक व पत्रकारांनी केलेले आहे. आवश्यकतेनुसार पुरावा कामे सादर करण्यास तयार आहे. हा प्रयत्न असफल झाला या संबंधाने दोषींवर विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीची तक्रारवर काय करवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषद पुसद च्या कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये वरील घटना रेकॉर्ड झाली आहे. ही बाब सीसीटीव्हीचे फुटेज बोलावून त्वरित खात्री करण्यात यावी. अन्यथा आरोपी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय सुध्दा तक्रार करताना आपला तक्रार होतो व्यक्त केला आहे तसेच या तक्रारीच्या प्रतीलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, मुख्याधिकारी नगरपालिका पुसद व जिल्हाधिकारी यवतमाळ, आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई बेलापूर मुंबई तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, तहसील कार्यालयासमोर यवतमाळ यांना मैलद्वारे पाठविले आहे.