17 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 31 जण भरती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ :
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 31 जण आहे. यात 14 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
आज (दि.24) चार जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. रविवारी वैद्यकीय महाविद्यालयाने 18 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1912 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. यापैकी 1894 रिपोर्ट प्राप्त तर 18 रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1781 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी 96 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 13 जण तर गृह विलगीकरणात 491 जण आहेत.
रमजान ईदनिमित्त शुभेच्छा : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना रमजान ईद निमित्त जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आणि पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळेस रमजान ईद कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आल्यामुळे मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा करावी. कुठेही गर्दी करू नये. बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000000

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..