महाविकास आघाडीच्या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ! सत्तेच्या गैरवापर करत संपुष्टात आणली उच्च पदस्थांची गरिमा !
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
नुकतीच यवतमाळ येथे महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली, या बैठकीला महाविकास आघाडीच्या गनमान्य नेत्यांसह त्यांची चेले चपाटे देखील उपस्थित होते, या बैठकीला सत्तेच्या जोरावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आल्याने आणि अधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शविल्याने उच्च पदस्थांची गरिमा संपुष्टात आली आहे.
काल स्थानिक विश्राम गृहावर पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्या-कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला आ. वजाहत मिर्झा, आ. इंद्रनील नाईक, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार, ख्वाजा बेग, विश्वास नांदेकर, बाळासाहेब मांगुळकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आणि अनिल गायकवाड उपस्थित होते, या बैठकीत कापूस खरेदी, रोजगार हमी, दारू विक्री व अनेक विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत, हा विषय योग्य असला तरीही अश्या विषयात अधिकाऱ्यांना ओढणे कितपत योग्य आहे? नेत्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत बोलावले तरीही अधिकाऱ्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवून अशा बैठकिंना जाणे कितपत योग्य ? आणि जर ही शासकीय बैठक होती तर याचे मिनिट्स काऊंट का करण्यात आले नाही ? आणि मिनिट्स काऊंट केले असतील तर उपऱ्या लोकांच्या उपस्थितीचे मिनिट्स कोण्या अधिकारात काऊंट होतात ? , जर ही बैठक शासकीय होती, तर जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरील लोकांना कुठल्या आधारावर बैठकीला बसू दिले ? आजमितीला भाजपचे 5 विधानसभा सदस्य आणि 1 विधान परिषद सदस्य अशी 6 जणांची संख्या आहे त्यातुलनेत सत्ताधारी पक्षाचे 2 विधानसभा सदस्य आणि एक विधानपरिषद सदस्य अशी तुल्यबळाने कमी संख्या असतानाही प्रशासनाने दबावात काम करणे योग्य आहे का ? पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या अशा बैठकांना प्रतिनिधित्व नसतांना जबरदस्ती मोघे, पुरके, माणिकराव, कासावार अश्या जेष्ठ नेत्यांनी हजेरी लावणे शोभणारी बाब आहे का ? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व प्रश्नाची कर्तव्यापरायण आणि अभ्यासू निडर जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी किंवा विरोधकांनी बोलावलेल्या बैठकीलाही एव्हढ्याच तत्परतेने आणि याच विणयतेने जिल्हाधिकारी उपस्थित राहावे अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली आहे.