बाल तपस्वी च्या हत्येचे राज्यभर पडसाद!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत(९४२२८६७७४८)
उमरी, (जि, नांदेड)–
उमरी तालुक्यातील नागठाणा खुर्द येथील महादेव मंदिराचे मठाधीश 108 प.पु.बालायोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज (वय.33) यांची व मठात राहणार्या भगवान बाबाराव शिंदे (वय.50) यांचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्हा हदरून गेला. बालयोगी महाराजांच्या हत्येने गावकर्यांमध्ये संताप व्यक्त करत आरोपीस अटक होणार नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेता आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत, असून आरोपीस लवकरच अटक केली जाईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले, तर भाजप नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे
सन 2008 पासून हे महादेव मंदिरात मठाधीश 108 प.पु. बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज हे राहत होते. मुळेचे कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथील हे रहिवासी आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी ते गावात आले. मठात राहून आधात्मिक व धार्मिक कार्य करत असत. महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक-भक्त येत असत.प्रती वर्षी येथे दिपोत्सव भरत असतो. यासाठी तीस ते चाळीस हजार भाविक येत.
उमरी तालुक्यातील तळेगाव येथे गोशाळा उभारण्याचे कार्य हाती घेतले होते. हे कामही प्रगतीपथावर होते. पंचक्रोशित धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले महाराजांच्या हत्येच्या बातमीने रविवारचा दिवस उजाडला.त्याचसोबत मठात राहणारे भगवान शिंदे (रा. चिंचाळा, ता. उमरी) या सेवकाची सुद्धा गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले आहे.
गावातील नागरिकांनी महाराजांच्या कर्नाटकमधील बल्लार येथील नातेवाईकांना निरोप कळविला आहे. उमरीपासून हजार-बाराशे किलोमीटर हे गाव असल्याने नातेवाईकांना पोहचायला एक ते दीड दिवस लागू शकतो. इकडे या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले आहे. आरोपीला अटक करा, तेव्हाच प्रेत ताब्यात घेण्यात येईल,असा पवित्र घेतला आहे.
—–
साईनाथ लिंगाडे संशयित
घटना घडली तेव्हा शेजारचे लोक जागे झाले. तेव्हा गावातील गुंडप्रवृत्तीचा युवक साईनाथ आनंदा लिंगाडे हा तेथेच होता. गावकर्यांनी महाराज कुठे असल्याची विचारणा केली, असता त्याने महाराज आत असल्याचे सांगत दुचाकीवरून पळ काढला. यापूर्वी सुद्धा त्याच्यावर वेगवेगळया गुन्हयाची नोंद असल्याचे समजते.
—-
राज्यभरात घटनेचे पडसाद
या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण या घटनेचा निषेध नोंदविला, असून पोलिस अधीक्षकांना आरोपीस तात्काळ पकडण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा घटनेचा निषेध नोंदवित, आरोपीच्या शोधासाठी पथक नेमल्याचे सांगितले.
इकडे भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित, पालघरनंतर नांदेड जिल्ह्यात साधूची झालेल्या हत्येच्या घटनेवरून राज्यसरकारला जबाबदार धरले आहे.