दिलासा : हूडी येथील संशयास्पद मृतक महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
: तालुक्यातील हुडी येथील संशयास्पद मृतक महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने पुसद व महागाव तालुक्यात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.तर यवतमाळ जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेला आली आहे.संजीवनी धुळधुळे असे मृतक महिलेचा नाव आहे.
यामागील पृष्ठभुमी अशी की ,
पुसद तालुक्यातील मुबईहून आलेल्या इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉसिटिव्ह रिपार्ट आल्यानंतर पुसद व महागाव तालुक्यात खळबळ उडाली.दुसऱ्या दिवशी पॉसिटिव्ह रिपोर्ट आलेल्या इसमाचा गावातील महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याने विविध चर्चेला पेव फुटले होते.जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुसद तालुका प्रशासनाने सदर महिलेचे कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब घेतले होते.मात्र मृत महिलेचा रिपोर्ट आताच प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे.