शेतातल्या रस्त्यासाठी युवकाची आत्महत्या पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांचेकडे न्यायाची मागणी करणारी चिठ्ठी लीहून आत्महत्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :
शेतात जाण्यासाठी रस्ता देण्यासाठी शेजारी देत असलेल्या त्रासाला कंटाळून २८ वर्ष युवकाने शेत शेजाऱ्याच्या शेतातच गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि २० रोजी दुपारी तिन वाजता तालुकयातील मार्लेगाव शेतशिवारात घङली
ज्ञानेश्वर भगवानराव कदम (२८) रा मार्लेगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन त्याने आत्महत्या करण्यापुर्वी प्रधानमंत्री , मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या चिठ्ठीतुन आत्महत्येचे कारण स्पष्ट होत असले तरी पोलीस याचा तपास करीत आहेत .
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चठ्ठीतील मजकुरा प्रमाणे १९५२ साली मृतक ज्ञानेश्वर च्या आजोबाने २ हेक्टर मार्लेगाव शिवारात शेत खरेदी केले होते त्यावेळी या शेतात ये जा करण्याकरिता रस्ता होता परंतु कालांतराने शेत शेजारी असलेल्या शेतकऱ्यानी हा रस्ता मृतकाच्या कुटुंबाला वापरन्यास मनाई केली
त्यामुळे तू आमच्या शेताचा वापर करू नकोस असे शेत शेजारी वारंवार सांगून त्रास देत होते सोबतच मृतकाच्या घरातील महिलांना शिवीगाळ करीत होते आणि एके वेळी तर धारदार शस्त्राने माझ्या वडिलांच्या अंगावर शेत शेजार्यांनी जाण्याचा प्रयत्न केला असल्याचा उल्लेख मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात आहे आत्महत्या करणे हा गुन्हा आहे परंतु लालफित शाहित अडकलेल्या प्रकरणामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मृतकाने पंतप्रधान ,मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले असून या माध्यमातून न्यायाची अपेक्षा केली आहे अश्या सर्व प्रकाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे मृतक ज्ञानेश्वर ने पत्रात मांडले असून प्रसार माध्यमांनी माझ्या मरणाची बातमी प्रसिद्ध करावी जेणेकरून माझ्या मरणा नंतर तरी माझ्या कुटुंबाला न्याय मिळेल असे नमूद करून कुटुंबातील सर्वांची माफी मागून मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान आज सकाळी मृतकाच्या भावाने व नातेवाईकांनी ज्या कारणासाठी आत्महत्या केली तो शेतातील रस्ता व चिठ्ठीत नमुद केलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी करीत शवविच्छेदनानंतर मृतकाचे शव घेण्यास नकार दिला होता . यामुळे प्रशासन त्रस्त झाले होते . अखेर दुपारी अचानक नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतल्यानंतर मृतकावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार पार पडले . या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये मृतकाच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे . या प्रकरणात अकस्मात मृत्युची नोंद केली असुन कोणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे समजते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….