पवित्र रमज़ान महिन्याचा शेवटच्या शुक्रवारी नमाज़ मस्जीद मध्ये पठण करण्याची परवानगी द्या : मुस्लिम समाज
पुसद येथील मुस्लीम समाजाची मागणी; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
अब्दुल रहेमान चव्हाण :
पुसद :
महाराष्ट्र राज्याने दिलेल्या सुचनेनुसार लॉक डाऊन मधील दिलेली परवानगी नुसार अत्यावश्यक वस्तुचे दुकाने शासकीय नियमा नुसार सुरू केले आहे .कोविड -१ ९ नोव्हल कोरोना विषाणूने संपुर्ण जगात अहाकार झाला आहे . जागतीक महामारी मधील मुस्लीम समाजाचे पवित्र रमज़ान महीना सुरू असुन मुस्लीम समाजाने शासनाच्या नियमनुसार मस्जीदमध्ये ५ लोकां करिता नमाज़ व ( तरावी ) च्या पठण केले आहे . शासनाने विशेष कार्यक्रमासाठी ( लग्न व मय्यत ) करिता २० ते ५० लोकाना करिता परवानगी दिली आहे . तसेच जुमातुल – विदा ( शेवटचे शुक्रवार ) व ईदूल फीत्र नमाज़चे पठण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण पुसद शहरचे सर्व मस्जीदला शुक्रवार ( जुमातुल विदा ) आणि ईदूल फित्र नमाज़ासाठी विषेश परवानगी देण्यात यावे .सर्व मुस्लीम समाज सोशल डिस्टनसिंग व सेनिटायझरची सुविधा करून नमाज़ पठण करतील .म्हणून परवानगी देण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन स्थानिक आमदार इंद्रनील नाईक,आमदार डॉ. वजाहत मिर्झा, व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे . रोजे पुर्ण झाल्यानंतर ईदची नमाज़ ईदगाहवर पठण करणे मुस्लीम बांधवांना आवश्यक आहे . परंतु जर तुम्ही पुसदच्या सर्व मस्जीदमध्ये ईदची नमाज़ पठण करण्याची परवानगी दिले तर कोणी ईदगाह वर जाणार नाही .असे निवेदनात पुसद येथील मुस्लिम समाजाने निवेदनातून विश्वास व्यक्त केला आहे .
यावेळी खान मोहम्मद खान , सैय्यद इश्तियाक , अतिकोद्दीन खतीब , अमजद खान , मिर्झा आदिल बेग व अन्य नागरिकांची उपस्थिति होती….