हुड़ी गावात आज एका महिलेचा अचानक मृत्यू
पुसद व महागाव तालुक्यात भीतीचे वातावरण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद तालुक्यातील हुडी गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी क्वाँरंटाईनचा हातावर शिक्का मारून घेतल्यानंतर घरी जात असताना ५० वर्षीय इसमाचा कुटुंबे हॉस्पिटल बोरगडी रोड जवळ अचानक मृत्यू झाल्याची घटना काल उघडकीस आली होती.
तालुक्यातील हुडी येथील एका व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात व प्रवास केलेल्या व्यक्तींना विलीनीकरण कक्षामध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्यांच्या कुटुंबातील एका महिलेचा रिपोर्ट रात्री नव्याने पॉझिटिव आला आहे. महिला ही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे. हा रिपोर्ट मंगळवारी रात्री प्राप्त झाला आहे. त्यानंतर पुसद तालुक्यातील हुडी येथील एका ३० वर्षीय महिलेचा आज दुपारी अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .या महिलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. त्यामुळे हुडी गावासह पुसद व महागाव तालुक्यात चर्चेला उधान आले आहे. या महिलेचे स्वब घेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शवविच्छेदन केले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..