केजरीवालांच्या नेतृत्वात ‘आप’ ने 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. यातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने सत्ता खेचून आणली आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे.
या सर्व राज्यांमध्ये दिल्ली-पंजाबमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानेही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी स्वतः अनेक रॅली आणि रोड शो केले होते. मात्र, पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले.
दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर अरविंद केजरीवालांनीआपला मोर्चा इतर राज्यांकडे वळवला आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांना अपयश आले. आताही त्यांनी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, या तीन हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले. आपने मध्य प्रदेशात 70 हून अधिक जागांवर, राजस्थानमध्ये 88 जागांवर आणि छत्तीसगडमध्ये 57 जागांवर उमेदवार उभे केले होते. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्येही मोफत वीज, पाणी आणि शिक्षण देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. अनेक मोर्चे आणि रोड शो करूनही ‘आप’ला काही फायदा झाला नाही.
‘आप’चे खाते उघडले नाही
‘आप’ने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 200 हून अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. बहुतांश जागांवर ‘आप’च्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. सिंगरौली नगराध्यक्ष आणि आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांचाही पराभव होताना दिसत आहे. याशिवाय टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेचाही जामीन जप्त झाल्याचे समजते.
‘आप’ला किती मते मिळाली?
आम आदमी पक्षाने तेलंगणात उमेदवार दिले नाहीत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला 0.97% मते मिळत आहेत. तर मध्य प्रदेशात 0.42% आणि राजस्थानमध्ये 0.37% मते मिळत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..