आता काय उडून येवू का ? कर्मचाऱ्याचे शो कॉज ला वरिष्ठाला उर्मट भाषेत उत्तर ; पत्र सोशल मीडियावर व्हायरल
रियाज पारेख :९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
महागाव :
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लावून पाळण्यात येत आहे. या काळात शासकीय कर्मचारी केवळ दहा टक्के कार्यालयात हजर राहतील असा आदेश शासनाने पारित केला होता. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महागाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आला विविध कारणांनी तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र या कारणे दाखवा नोटिसा ला उत्तर देताना, कर्मचारी धमकीवजा शब्दप्रयोग केला हे उत्तर संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सर्वसाधारणपणे वरिष्ठांकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर अधिनस्त कर्मचारी आपली बाजू आदरपूर्वक भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो, व विनंती करून प्रकरण निकाली काढण्याचे प्रयत्न करत असतो. मात्र उलटाच प्रकार घडला आहे. महागाव तहसीलदार यांना दिलेल्या नोटीस चे उत्तर अतिशय उर्मट भाषेचा व शब्दांचा प्रयोग करीत दिला आहे. इतकेच नव्हे तर तहसीलदारांनी सलग दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली त्यानंतरही संबंधित लिपिक नसल्याने गावात अडकून पडलो आहे, “मी काय उडत येऊ का” इतकेच काय तुम्ही व मी आपण दोघेही ही मेलो तरी तहसीलचे कामकाज सुरळीत सुरू राहील. त्यामुळे अशा नोटीस देऊ नये .अशा शब्दांचा वापर करीत आपली बाजू मांडली आहे. पहिल्या पत्रात तर चक्क धमकी वजा इशाराच दिला आहे. रजा घेईल, सेवानिवृत्त घेईल, म्हणजे काहीही बिघडणार आहे. मात्र “मी कुणालाही सोडत नाही” , असे म्हणत इतर कर्मचारी पेक्षा तुमच्या बद्दल माझ्या मनात अजूनही आदरर कायम असल्याचेही नमूद केले आहे. तसेच या उत्तराच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांना ही माहिती दिली आहे.
आता हेच मजेशीर पत्र प्रत्येक विभागातील अधिकारी वर्गाच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये फिरत आहे. .यवतमाळ जिल्ह्यात महागाव तहसीलमध्ये नेमका काय प्रकार सुरू आहे, अशी विचारणा होऊ लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्या भाषेत उत्तर देण्यात आले तो प्रकार निश्चितच असमर्थनीय असल्याचे इतर अधिकाऱ्यांकडून सांगल्या जात जात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….