राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुसद (शरद पवार गट) यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दि.02 ऑक्टोबर 2023 रोजी पुसद शहरातील महात्मा गांधी चौक येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला असे लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष मा. ऍड आशिष देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते. आणि ही शिकवण आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिली. असे त्यांनी सांगितले. तसेच पुसद नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी यांचे त्यांच्या स्वच्छतेच्या कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष मा. ऍड आशिष देशमुख यांनी सत्कार व सन्मान केला.

यावेळी कार्यक्रमाला साहेबराव ठेंगे , नाना जळगावकर , सुरेश धनवे , दीपक जाधव , अशोक बाबर , फहीम अहमद , माधव वैद्य , शाकिब शाह , नारायण कराळे , शामराव व्यवहारे , लक्ष्मीकांत जयस्वार , ऍड. विनोद पाटील , सिद्दिक लोहार , समाधान नरवाडे , डॉ. पदमवार , जयंत पाटील , प्रवीण पाटील , यशवंतराव पाटील , सय्यद सलीम , शेख शब्बीर , कैलास मुकेश , सरफराज जाटू , शिवाजी ठेंगे , सय्यद ताज , सय्यद अली , सय्यद सोहेल , सुधाकर धुळधुळे , बाबाराव खिल्लारे , मुनाफोद्दीन खतीब , दीपक अवचार , इम्रान पटेल , सरफराज जाटू , तेजस मुकेश आणि अनेक असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमाला हजर होते.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….