मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी आज मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप १६७ जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असून दोन दशकांनंतर सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुरुवातीच्या कलानुसार भाजप सुमारे १६७ जागांवर आघाडीवर आहे, तर टीएमसी फक्त १०४ जागांवर मर्यादित राहिली आहे. मतमोजणीच्या १५-२० फेऱ्या अजून शिल्लक असल्याने आकडे बदलू शकतात, मात्र भाजपची आघाडी दमदार आहे. यावेळी ९२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.
रोमांचक लढत
भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजप उमेदवार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे. पहिल्या काही फेऱ्यांत ममता पिछाडीवर होत्या, नंतर त्यांनी कमबॅक केले. सध्या ममता सुमारे ३००० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र सुवेंदू अधिकारी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
सुवेंदू अधिकारी म्हणाले, “भवानीपूरमध्ये ६-७ फेऱ्या झाल्यानंतर माझी कामगिरी चांगली दिसेल. नंदीग्राममध्येही अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. यावेळी हिंदू मतांचे मोठे एकत्रीकरण झाले आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत येईल आणि आमचे सरकार स्थापन होईल.” मुस्लीम मतदारांबाबत बोलताना ते म्हणाले की, यावेळी मुस्लीम मतदारांनी नेहमीप्रमाणे एकगठ्ठा टीएमसीला मतदान केले नाही; काही मते इतर पक्षांकडे वळली आहेत.
ऐतिहासिक उलटफेर
२०२१ च्या निवडणुकीत टीएमसीने २१५ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी भाजपने शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मजबूत मुसंडी मारली आहे.कोलकाता आणि आसपासच्या भागातही भाजप आघाडीवर दिसत आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..