“एक गाव, एक गणपती” नानंद खुर्द गावात परंपरा २० वर्षापासून कायम ; संपूर्ण तालुक्यात गावाची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यातील नानंद खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या विस वर्षांपासून एक गाव, एक गणपती ची परंपरा प्रेरणा गणेश मंडळाने कायम ठेवली आहे काही ज्येष्ठ लोकांच्या संकल्पनेतून गावसभेच्या ठरावानुसार गावात एकमत झाले तेव्हापासून गावात ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना उदयास आली.
श्रीच्या मूर्ती समोर दहा दिवस ज्योत तेवत ठेवण्याचा गावातील युवकांनी मानस करताच ती ज्योत दरवर्षी प्रमाणे माहुर गडावरून आणली जाते. ती आजतागायत ही संकल्पना कायम आहे. गणेशोत्सव हा आनंदाच्या पर्वणीचा सण भावभक्तींचा गजर व मनोरंजनाच्या माध्यमातून सर्वांना ११ दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. अलीकडे सार्वजनिक मंडळांची संख्या वाढत असल्याने भाविकसुद्धा विभागले जात आहेत. यामुळे खर्चही वाढत आहे.ग्रामीण भागात एकोपा टिकून ठेवण्यासाठी एक गाव एक गणपती संकल्पना अधिक रुजविणे गरजेचे आहे.लोकांना संघटित करता यावे हाच गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
नानंद (खु.) गावातील काही
तरुणांनी एक गाव एक गणपती या संकल्पनेचे महत्त्व पटवून दिल्याने तरुणवर्गानेही ही प्रथा अखंडपणे सुरू ठेवली आहे. गावातील गणेशोत्सव पूर्णपणे विधायक स्वरुपात साजरा केला जातो.थेट माहूरगडावरून अखंड ज्योत आणुन ती ज्योत दहा दिवस अखंड प्रज्वलीत ठेवतात ज्योत प्रेरणा गणेश मंडळातील सदस्य कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहाने ज्योत आणायला जातात गावात दहा दिवस कीर्तन व भजनाचा भक्तिमय वातावरणात व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात.यामध्ये प्रेरणा गणेश मंडळाचे अध्यक्ष नारायण धोत्रे, उपाध्यक्ष समाधान टारफे, सचिव विजय काळे, सदस्य राजू ढेंगळे, सुरज बोडके,माधव धोत्रे,वैभव डुकरे,वैभव काळे,राहुल जटाळे, आकाश बेले,दिनेश सावंत, विशाल उडाळकर,अजय वडुळकर,मारोती खराटे,प्रवीण टारफे (बोंडे),योगेश आमले, अविनाश सावंत,सुनील वडुळकर,बाबू बेले,संतोष दांडेगावकर सह गावातील प्रतिष्ठित नागरिक दहा दिवस अथक परिश्रम घेतात व गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….