सुधीर मुनगंटीवार ब्रिटनला रवाना ; वाघनखांसंदर्भात ‘ही’ कार्यवाही करणार पूर्ण, म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ती करार तत्त्वावर महाराष्ट्रात आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार ब्रिटनला रवाना झाले आहेत.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं.
यावेळी उपस्थित शेकडो शिवप्रेमींसोबत त्यांनी संवाद साधला. मुनगंटीवार म्हणाले की, हजारो सूर्यांचं तेज असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्या वाघनखांबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, ती महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार होणार आहे. त्या कराराची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुनगंटीवार ब्रिटनला रवाना झाले. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं मुंबईत आणण्यात येतील. पुढे राज्यभर विविध ठिकाणी ती ठेवली जाणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत वेळापत्रकच दिलं आहे.
दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांच्या वापरातीलच नाहीत, असा दावा केलाय. सावंत म्हणाले की, ही वाघनखं अफझल खानाच्या वधावेळी वापरलेली नाहीत. कारण अफझल खान वधाच्या वेळेला जी वाघनखं वापरली त्याविषयीची स्पष्टता आहे.
१९१९ पर्यंत ती वाघनखं सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याच्या नोंदीदेखील आहेत. १९१९ पर्यंत इथं वाघनखं असतील आणि त्याची छायाचित्र, नोंदी असतील तर त्याच्याही अगोदरच म्यूझियमध्ये गेलेली वाघनखं ती असू शकत नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….