म्हणून अजित पवार अमित शाहांच्या दौऱ्याला अनुपस्थित होते; स्वतःच सांगितलं कारण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाहांनी तब्बल ४५ मिनिटं चर्चा केली.
अमित शाहांच्या दौऱ्यामध्ये सर्वात जास्त चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे अजित पवारांची अनुपस्थिती. भाजपचे देशातले दुसरे मोठे नेते राज्यात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अनुपस्थित कसे? असा प्रश्न दिवसभर उपस्थित होत होता. त्यावर आज अजित पवार यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलेलं आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शनिवारी दिवसभर बारामतीमध्ये विविध बैठकांना उपस्थिती लावल्याचं सांगितलं. तो कार्यक्रम पंधरा दिवस आधीच ठरला होता. त्यामुळे आपण याबाबत अमित शाह यांच्या कार्यालयाला तशी माहिती दिली होती, असं त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले अजित पवार?
२३ तारखेला मी बारामतीला वेळ दिलेली होती. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ शकलो नव्हतो. बारामती येथील पाच महत्त्वाच्या संस्था सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी-विक्री संघ, बारामती दूध संघ आणि बाजार समिती; यांच्या जनरल बॉडीची मीटिंग होती. या बैठकांचा अजेंडा पंधरा दिवस आधीच ठरलेला होता. त्यामुळे मला अमित शाहांच्या दौऱ्यामध्ये जाता आलं नाही.
अजित पवार पुढे म्हणाले की, दौऱ्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, याबाबत मी अमित शाह यांच्या कार्यालयाला कळवलं होतं. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घातलं होतं, असं पवारांनी स्पष्ट केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..