मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात ; बैठकीत घेतला मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या अल्टीमेटमला येत्या १४ ऑक्टोबर रोजी ३० दिवस पूर्ण होत आहेत.
या पार्श्वभूमिवर १४ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारला जागं करण्यासाठी हा कार्यक्रम असणार असून यामध्ये जरांगे मराठा समाजाला संबोधित करतील. तसेच मराठा आरक्षणासाठी जरांगे महाराष्ट्रभर दौरा देखील करणार आहेत.
अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक झाली. यात पुढील लढ्याबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या १४ तारखेला अंतरवाली सराटीत जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तसेच १४ तारखेनंतर त्यांचा महाराष्ट्र दौरा देखील सुरू होईल.
जरांगे म्हणाले की, सरकारने वेळ मागीतला आहे आणि आरक्षण देणार देखील तेच आहेत. वेळ देणं अपेक्षित होतं म्हणून वेळ दिला आहे. आम्ही जास्तीचे दहा दिवस दिलेत. त्यांनी एक महिना वेळ मागितला होता आम्ही ४० दिवस वेळ दिला आहे. १४ तारखेला त्यांचे बरोबर ३० दिवस पूर्ण होत आहेत, त्यापुढं १० जास्तीचे दिले आहेत. त्या काळात त्यांनी आरक्षण द्यावं यासाठी १४ तारखेला देखील येथे त्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे.
जरांगे पुढं म्हणाले की, आमचे सर्व कार्यक्रम शांततेत होणार आहेत, राज्यात देखील शांततेत साखळी उपोषण सुरू आहे. काल मोठी बैठक मराठा समाजाची पार पडली ज्यामध्ये सर्वांनी कार्यक्रम, महाराष्ट्र दौऱ्याविषयी निर्णय घेण्यात आला असेही जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. त्यांच्याकडून राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिकाही घेण्यात आली. सरकारला दिलेल्या मुदतीत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर जरांगे पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..