“अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपत्रातेबाबत कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. पण, अपात्रतेबाबत कारवाई करण्यासाठी लागेल तेवढा वेळ घेणार.
त्यासाठी कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. यावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखला जाईल. पण, कोणत्याही प्रकारची घाई अपत्रातेबाबतच्या निर्णयासाठी करणार नाही. घटनात्मक तरतुदी आणि विधानसभा अपात्रतेच्या नियमांचा विचार करून योग्यरित्या निर्णय घेऊ. याने कुणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. मी घेतलेला निर्णय नियमबाह्य आणि घटनाबाह्य नसेल. संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार असणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा मी मी घेणार आहे. कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही,” असं विधान राहुल नार्वेकर यांनी केलं होतं.
“…याचा गैरफायदा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत”
यावर असीम सरोदे म्हणाले, “संवैधानिक तरतुदीनुसार न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वेळेची मर्यादा घालू शकत नाही. विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. याचा गैरफायदा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्याला आदेश देऊ शकत नाही, हे नार्वेकरांना माहिती आहे.”
“नार्वेकर अपात्रतेबाबतच्या सुनावणीची तारीख निश्चित करतील”
“पण, त्यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ‘विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर वागण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या कामकाजाचे विश्लेषण करण्याचा अधिकार आम्हाला आहे.’ त्यामुळे २८ किंवा २९ तारखेला राहुल नार्वेकर अपात्रतेबाबतच्या सुनावणीची तारीख निश्चित करतील,” असं सरोदे यांनी म्हटलं.
“पैशांचा खेळ जास्त दिवस चालणार नाही”
“राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. कारण, त्यांना संविधान मानायचं नाही. पळून गेलेल्या आमदारांना लोकांनी मनातून अपात्र केलं आहे. त्यामुळे आमदारांना निवडणूक अत्यंत कठीण जाणार आहे. पैशांचा खेळ जास्त दिवस चालणार नाही. हे भारतीय लोकशाही दाखवून देईल,” असंही समोदे यांनी सांगितलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..