शिक्षक व कर्मचारी पतसंस्थेची ५१ हजारांची मदत
पतसंस्थेचे अध्यक्ष एल.पी.राठोड यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला
पुरुषोत्तम कुडवे : ९३७०४६४८२४
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
दिग्रस :
संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. यालाच प्रतिसाद देत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीत जि.प.शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रस यांचे वतीने ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यवतमाळ जिल्हात लॉकडाऊन सुरु असून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. लॉकडाऊन वाढल्याने जिल्ह्यातील अनेकांचे हाल होत आहेत, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरजुंना मदत करण्याच्या हेतूने दिग्रस येथील जि.प.शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे उपस्थितीत ५१ हजारांचा धनादेश पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे सुपूर्द केला. याप्रसंगी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजुदास जाधव व सचिव राजेंद्र इरतकर उपस्थित होते. जिल्ह्यावर आलेल्या कठीण प्रसंगी पतसंस्थांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीला सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी यावेळी केली.