महागाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात मुदत संपलेल्या 38 ग्रामपंचायतवर 7 मे पासून प्रशासक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव
तालुक्यातील पहिल्या टप्प्यात मुदत संपलेल्या 38 ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे 7 मे रोजी कार्यरत असलेल्या सरपंच व सदस्यांची मुदत संपत असल्यामुळे ही कार्यवाही सुरू झालेली आहे. पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमणूक देण्यात येणार आहे विस्तार अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे साधारण पाच ते सहा ग्रामपंचायतचा कारभार एका-एका विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या आपत्ती व्यवस्थापनामुळे ग्रामपंचायतच्या लागलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात मुदत संपलेल्या 38 ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता नामांकन दाखल होऊन छाननी सुद्धा झालेली आहे दरम्यान शासनाने सदर निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत निवडणूक लागलेल्या त्या ग्रामपंचायतची मुदत 7 मे रोजी संपत आहे अशा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतवर एक दिवस पूर्व प्रशासक नेमण्याची कार्यवाही ही सुरू झालेली आहे.7 मे आणी 9 मे रोजी महागाव तालुक्यातील एकूण 77 ग्रामपंचायतची मुदत संपणार आहे त्यापूर्वीच सदर ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.
प्रशासक पदावर नेमणूक करताना आहेत या सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणूक देण्यात यावी किंवा कार्यरत सरपंच सदस्यांना मुदतवाढ देण्यात यावी कोविड 19 साथरोग नियंत्रणामध्ये सरपंच सदस्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे साथरोग नियंत्रण करताना जनजागृती करणे गरजूंना मदत करणे समाज उपयोगी काम सरपंच सदस्य करू लागलेले आहे त्यामुळे त्यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करणे किंवा मुदतवाढ देण्याची मागणी सरपंच प्रवीण ठाकरे पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….