इंडिया नेत्यांच्या जयघोषात राहुल गांधींची लोकसभेत ग्रँड एंट्री…! १३६ दिवसांनंतर केलं “कमबॅक” ; VIDEO
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. तब्बल 136 दिवसांनंतर ते आज संसदेत आले आहेत. मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांच्या शिक्षेनंतर 24 मार्च रोजी खासदार पद गेले होते.
4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. तीन दिवसांनंतर त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. राहुल गांधींची लोकसभेत ग्रँड एंट्री झाली आहे. काँग्रेस नेत्यांसह इंडिया नेत्यांच्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

राहुल गांधी संसद भवनाच्या आवारात आल्यानंतर फक्त काँग्रेस नेतेच नाही, तर विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. राहुल गांधी संसदेत दाखल झाले त्यानंतर काँग्रेस खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सुध्दा त्यांचं स्वागत केलं आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आहे.
मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींचे खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांना लोकसभा सचिवालयाकडून संसदेतील सदस्यत्व बहाल करण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. आता चार महिन्यानंतर संसदेत दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षाकडून एकच जल्लोष करण्यात आला आहे.
राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून यासंबधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची लोकसभेच्या सचिवालयाकडून आज (सोमवारी) पडताळणी केली. त्यानंतर खासदारकीबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..