लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस लागली कामाला ; विजय वडेट्टीवार, सुनिल केदार यांच्याकडे नवी जबाबदारी ; आजपासून अनेक जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरु…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- पुढील लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस तयारीला लागली असून मतदारसंघनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलीये. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निरीक्षक म्हणून जबाबदारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलीये.
माजीमंत्री सुनील केदार यांच्याकडे वर्धा व यवतमाळ तर डॉ. नितीन राऊत यांच्याकडे चंद्रपूर व गडचिरोली मतदार संघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. याशिवाय समन्वयकांचीही नियुक्ती करण्यात आली असून उद्यापासून बैठक घेण्याची सूचना प्रदेश कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
विविध विरोधी पक्षांची मोट बांधण्यात आल्यानंतर कॉंग्रेसने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती केली.
पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघात निरीक्षक म्हणून प्रामुख्याने नागपुरातील रहिवासी असलेल्या नेत्यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निरीक्षक नियुक्त करण्यात आले.
रामटेक मतदारसंघात रविंद्र दरेकर यांना तर नागपूर मतदारसंघात माजी आमदार वीरेंद्र जगताप, भंडारा गोंदिया मतदारसंघात राजा तिडके यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्धा, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात सुनील केदार निरीक्षक असून वर्धा जिया पटेल तर यवतमाळ-वाशिमसाठी संजय राठोड यांना समन्वयक करण्यात आले आहे.
गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर मतदारसंघात माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले तर डॉ. नामदेव किरसान यांना गडचिरोलीचे समन्वयक आणि मुजीब पठाण यांना चंद्रपूरचे समन्वयक घोषित करण्यात आले.
आजपासून बैठकांचे सत्र
निरीक्षक व समन्वयक यांनी जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन लोकसभा क्षेत्रातील स्थितीचा आढावा घ्यावा, अशी सूचना प्रदेश कॉंग्रेसने केली आहे. ७ ऑगस्टपासून या बैठकांना सुरुवात होणार आहे. १४ ऑगस्टपर्यंत या बैठका होणार असून सर्वच मतदारसंघातील माजी खासदार, आमदार व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..