‘आधी आमदार तरी बना.. ‘, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर भाजप नेत्याचा टोला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरुन राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू आहेत. भाजप-शिंदे गट यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काही नेते भाजप-शिंदे गट यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्रिपद अजित पवार यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना खोचक टीका केली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अशिष शेलार म्हणाले की, ‘नाना पहिले आमदार बना, मुख्यमंत्री बनण्याआधी आमदार बनावं लागतं. तो पहिला प्रयत्न यशस्वी होतात का बघा’, असा टोला शेलारांनी नाना पटोलेंना लगावला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
‘आपण मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो’, असे पटोले म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान दर्शनासाठी पोहचले होते. तसेच खुलदाबाद शहरातील दर्ग्यावरती त्यांनी चागर देखील चढवली. यावेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्न विचारला.
‘कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या मनात हा विचार येत असेल तर ही दैवी कृपा आहे. लोक या श्रद्धेने काम करतात. शेवटी देव कोणालातरी निमित्त करत असतो, देवाला मला निमित्त करून अजून काही चांगलं करून घ्यायचं असेल तर तो देवांचा अशीर्वाद असतो. मनुष्य हा कृती आणि कर्म करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे जे काही कोणाच्या मनोकामना, सोबती आणि चाहत्यांच्या इच्छा असतील ती पूर्ण होवो’, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..