पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा धडकला ; महाराष्ट्र प्रवक्ते फारुख अहमद यांची मोर्चाला विशेष उपस्थिती…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक, 2 ऑगस्ट 2023 रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन पुसद येथे करण्यात आले होते,
क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाष चंद्र बोस डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, या मार्गे वंचित च्या कार्यकर्त्यांनी, घोषणा देऊन पुसद करांचे लक्ष वेधले,केवटे परिवारातील युवकांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, केवटे परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, परळी येथील पोलीस कस्टडीत मारल्या गेलेल्या जरीन खानला न्याय मिळालाच पाहिजे, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, होश में आओ होश में आओ पोलीस प्रशासन होश मे आओ , अशा गगनभेदी घोषणांनी पुसद करांचे आजच्या मोर्चाने लक्ष वेधले, मणिपूर येथील, कूकी आदिवासी समाजाच्या, महिलेची नग्न धिंड काढून
आदिवासी महिलेची, क्रूर चेष्टा करणाऱ्या आरोपीचा जाहीर निषेध करण्यात आला. अशा विविध मागण्याचे फलक हातात घेउन
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चाला विविध जाती धर्मातील अनेक कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय संख्या होती ऊन ,पाऊस ,वारा यांची तमा न बाळगता, तमाम बहुजन समाजातील अन्याय झालेल्या, व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे या आशेने, सर्व कार्यकर्ते घरच्या भाकरी बांधून स्वखर्चाने पुसदच्या मार्गाने निघाले होते.
या जन आक्रोश मोर्चाचा समारोप, पुसद उपविभागीय कार्यालय येथे येऊन मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले,
या मोर्चाला संबोधित , करताना वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ता, फारुख अहमद म्हणाले की,जाती व धर्माच्या नावाखाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र संविधानाचा, व सत्तेचा वापर करून,असंविधानिक कृत्य करून, हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार चालवल्या जात आहे, दलित आदिवासी मुस्लिम यांना टारगेट करून, त्यांच्या हत्या व खून केल्या जात आहे,
परळी जिल्हा बीड येथील जरीन खान, बोंढार हवेली नांदेड येथील अक्षय भालेराव चा खून , पुसद येथील राहुल केवटे वक्रिस्केवटे यांची निर्घृन हत्या, तसेच अमळनेर जिल्हा मुस्लिम अश्फाक शेखचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होतो जाती-धर्माच्या नावाखाली निष्पाप मुस्लिमांना मारल्या जात आहे, दलित आदिवासींचे दिवसाढवळ्या खून केले जात आहेत तरी सुद्धा शासन प्रशासन संवेदनशील का नाही? हा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम जिल्ह्याच्या वतीने, उपविभागीय कार्यालय पुसद येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध मागण्याचे व शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, कार्तिकेएन एस. यांचे मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना देण्यात आले.
या मोर्चाला राज्य प्रवक्ता, फारुख अहमद, पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील,यवतमाळ जिल्हा प्रभारी, मोहन राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष, प्रमोद राऊत, जिला महासचिव डी.के दामोधर, जिल्हा उपाध्यक्ष शामराव राठोड, भाऊराव गायकवाड, मौलाना सय्यद हुसेन ,उकेश्वर मेश्राम, पांडुरंग मेश्राम, उत्तम ढोले,लक्ष्मण वानखेडे, सतीश उरकुडे, सुभाष सावते,नितीन धुळध्वज, विजय लहाने ,सतीश खाडे, ज्ञानदीप कांबळे , पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, आनंद भगत, प्रसाद खंदारे, राजरत्न लोखंडे डॉ. अरुण राऊत,अजय तलीकोटे,राहुल कांबळे, कैलास धबाले, माधवराव मनवर, प्रदीप वाहुळे
विद्या नरवाडे, राधिका हराळ, करुणा चौधरी,भारती सावते, करुणा मून,संघमित्रा कानिदे,सरला चचाने, आशाबाई तालिकोटे, छाया राठोड, चंद्रकला टाळीकोटे, अंकिता टालीकोटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व ग्रामीण शाखेपासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..