मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानं खळबळ..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीनं थेट मंत्रालयात धाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यानं स्वतःच्या शरिरावर धारदार ब्लेडनं वार करुन घेतल्याचं प्राथमिक माहितीतून कळतं आहे.
या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सुरेश जगताप असं या ४६ वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो मूळचा साताऱ्यातील फलटणाचा रहिवासी आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या व्यक्तीनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला.
२ ऑगस्टच्या दुपारी सुरेश मंत्रालयातील पास घेऊन ६ व्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरील लॉबीत आला. यावेळी कुणाला काही कळायच्या आत त्यानं स्वत:जवळील कटरने स्वत:च्या डाव्या मनगटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीनं जीटी रुग्णालयात हालवलं.
दरम्यान, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात सुरेश जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ४१ ‘अ’ १ अन्वेय अंतर्गत नोटीही जारी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मरीनड्राइव्ह पोलीस करत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..