जमीयत उलेमा महाराष्ट्र कडून हिवरा संगम येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा संगम :- दिनांक 21 जुलैला आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हिवरा येथील पुष्पावंती नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील अनेक घरात पाणी शिरून अनेकांचे अतोनात नुकसान झाले होते. घरातील होते नव्हते अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू सह, भांडीकुंडी अक्षरशः वाहून गेले होते त्यामुळे आर्थिक नुकसानीसह अनेकांचे संसार उघड्यावर आले होते . अशा गरजवंत पुरग्रस्तांना यवतमाळ येथील जमीयत उलेमा महाराष्ट्र या संघटनेकडून मदतीचा हात देण्यात आला. मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून जाती-धर्माच्या भिंती तोडून अशा बिकट परिस्थितीत माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या या संघटनेकडून हिवरा येथील अनेक पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू सह किराणा धान्य कपडे ब्लॅंकेट अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. जमीयत उलेमा हिंद महाराष्ट्र,हाफीज नदीम सिद्दिकी प्रेसिडेंट महाराष्ट्र, मुक्ती रोशन साहब सेक्रेटरी विदर्भ यांच्या पुढाकारातून, मुक्ती एजाज शेख सचिव जिल्हा यवतमाळ, मौलाना इमरान अध्यक्ष यवतमाळ वसीम खान सचिव यवतमाळ, मोहम्मद मुजम्मील मौलाना अब्दुल गफीर, इशराक मोहम्मद फैसल यांच्या उपस्थितीत हिवरा येथील मदिना मज्जिद येथे मध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात मदतीचे हे वाटप करण्यात आले. यावेळी हिवरा येथील प्रतिष्ठित नागरिक शफी हबीब सूरैय्या, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील, हिवरा किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय बोम्पीलवार, हिवरा येथील माजी सरपंच धोंडीराव बोरूळकर, पत्रकार भगवानराव फाळके, पत्रकार संदीप कदम, पत्रकार बिहारी जयस्वाल यांचे सह मौलाना मन्नान शेख, जावेद कुरेशी ,अन्वर चव्हाण, शेख सत्तार, शेख फिरोज, शेख शब्बीर शेख आजम, शेख कलीम शेख शारीक, शेख अल्ताफ,शेख समीर, सलीम कच्ची, शेख अतिक, शेख इमरान, शेख युसूफ, आरिफ कच्ची, यांचे सह मधील कमिटी व अंजुमन कब्रस्तान सेवा समिती चे सदस्य उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..