खा.हेमंत पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी ; तालुक्यातील अनेक भागांची पाहणी ; प्रशासन लागले कामाला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- सतत 2 दिवस झालेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित ग्रामस्थांना तात्काळ आर्थिक मदत देण्याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना आदेश दिले.त्यामुळे प्रशासन आता कामाला लागले आहेत.सदरील गावातील 3 घरे पूर्ण पणे वाहून गेली त्या कुटूंबना खासदार यांनी वैयक्तिक मदत देऊन शासना कडून २ दिवसात आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.आनंदनगर , हिवरा , खडका , लेवा, अंबोडा, आणि परिसरातील गावात वीज पुरवठा पूर्ण पणे खंडित झाल्याने महावितरण अधिकाऱ्याची कानउघडी केली.
तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही खा.हेमंत पाटील यांनी दिलेत.

हिवरा , खडका ,लेवा, अनंतवाडी, अंबोडा, कलगाव, शिरपूर , धनोडा येथील नुकसानग्रस्त शेती आणि पडझड झालेल्या घरांची ची केली.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांची आपबिती कथन केली.आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. खासदार यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांचे हिवरा येथील इ क्लास च्या १२ एकर जागेत स्थलांतर करून द्यावे अशी विनंती केली.त्यामुळे खासदार यांनी अधिऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ तसा प्रस्ताव सादर करणे बाबत आदेश दिले व लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिले. गावातील महिलांनी आपली आपबीती सांगितल्या नंतर खासदार हेमंत पाटील यांनी त्याना धीर देत त्यांना धान्य पुरवठा करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले. या वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम ,उपजिल्हा प्रमुख डॉ.बी.एन.चव्हाण,न.प.महागाव गटनेते रामराव नरवाडे,तालुका प्रमुख राजू राठोड,सरपंच संघटना अध्यक्ष अमोल चिकने,तालुका प्रमुख संतोष जाधव,शहर प्रमुख अतुल मैड, युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश कदम,शिवसेना तालुका संघटक कपिल पाटील,माजी नगरसेवक संदीप ठाकरे,रवी रुडे,युवासेना तालुका प्रमुख राम तंबाखे,उपतालुका प्रमुख पवन राठोड,उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे,तहसीलदार संजीवनी मुपडे,कृषी अधिकारी चव्हाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वानखेडे,दत्तराव कदम, ग्रामपंचायत सदस्य चायन राठोड जगदिश राठोड,दत्ता गाडेकर,संतोष राठोड,सुरेशिंग राठोड,विलास जाधव,संजू राठोड,अनिल जाधव सुभाष जाधव,विजू जाधव युवराज चव्हाण,धनराज राठोड , प्रवीण गावंडे उप तालुका प्रमुख, अदित्य देशमुख, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अविनाश जाधव उप शहर प्रमुख, चयन राठोड विभाग प्रमुख, कुणाल राठोड उप सरपंच अनुप मीरासे, निखिल मोरथकर, धीरज ठाकरे व आदी उपस्थित होते.

रितेश पुरोहित यांची पुरग्रस्तांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप :-
अतिवृष्टी मुळे खडका, हिवरा , आणि आनंदनगर येथील अनेक कुटुंब उघड्यावर आले. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांनी जीवनावश्यक किराणा किटचे वाटप केले.त्यांच्या या सामाजिक कार्याने नुकसान ग्रस्त कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..