मणिपूर घटनेतील आरोपींना फाशी द्या ; पांढरकवड्यात आदिवासीं समाज आक्रमक ; उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकाला आदिवासीं समाजाचा भव्य मोर्चा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पांढरकवडा :- गेल्या ९० दिवसापासून हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमधील आणखी एका घटनेने देशात खळबळ उडाली आहे. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून या तीव्र पडसाद देशभरात उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पांढरकवड्यात आदिवासीं समाजाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून यातील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली.
महीला अत्याचाराची सदर घटना ताजीच असताना पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे एका कोलाम आदिम जमातिच्या एका महिलेचे दि.२२ जुन २०२३ रोजी सामुहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. याचं बरोबर राज्यासह देशात होत असलेल्या आदिवासी समाजाच्या वाढत्या अन्याय अत्याचारा विरोधात या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. निग्गरगठ्ठ मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध या मोर्चातून करण्यात आला. समाजाकडून करण्यात आलेल्या सर्व मागण्यांचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
शहरातील मित्र क्रीडा मंडळ मैदान ते केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. समाजातील यवतमाळ जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटी,गोंडवाना संग्राम परीषद, श्यामादादा कोलाम संघटना, गोंडवाना जंगोंम दल या संघटनेने या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवून शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मोर्चात आदिवासी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष भाऊरावजी मरापे, आदिवासीं विकास परिषदेचे जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे, संग्राम परिषदेचे निरंजनभाऊ मसराम, जंगोम दलाचे माधवराव टेकाम, सुवर्णाताई वरखडे, शामादादा कोलाम संघटनेचे राहुलभाऊ आत्राम,माजी सभापती मिथुनभाऊ सोयाम, लिलाधरजी आरमोरीकर, सागरभाऊ मडावी, महादेव सिडाम, होमदेवराव किनाके, सदाशिवराव मडावी, बबनराव सोयाम, बंडूभाऊ सोयाम, अखिलभाऊ कोठारे, राजुभाऊ चांदेकर, जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रसिध्दी प्रमुख वाणीताई तोडासे यांच्यासह अन्य सामजिक संघटना पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..