मुलाने केली आईची हत्या
राहुल चुटे तालुका प्रतिनिधी आमगाव आमगाव :-
आमगाव तालुक्यातील बाम्हणी गावातील ऐका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून हत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. तालुक्यातील आमगाव देवरी रोडवरील बाम्हणी गावातील प्रमोद मनीराम शेंडे वय ३८ वर्षे हा नेहमी गोठयात पलंगावर झोपत असतो. आज सकाळी २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता गोठयात झोपला 2 असता प्रमोद ची आई मिनाबाई शेंडे वय ५५ वर्षे नेहमीप्रमाणे गोठा साफ करण्यासाठी आली व झोपलेल्या प्रमोदला हाक देऊन उठवू लागली. मला दररोज सकाळी सकाळी उठवून माझी झोप मोडीत असते असे म्हणून बाजूला असलेली कुऱ्हाड उचलून रागाच्या भरात दांड्याने वार केला. रक्तबंबाळ झालेल्या मिनाबाईला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान मिनाबाई मरण पावली. ही बातमी गावात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर महिलेच्या पती मनीराम शेंडे वय ५८ वर्षे यांच्या तक्रारीवरून जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलाविरुद्ध भा द वी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम काळे व त्यांची चमू करीत आहेत.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड….
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….