नरसाळा येथे शंभर गरजूंना मदतीचा मिळाला आधार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : लॉकडाऊनदरम्यान ग्रामीण भागातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. शहरात वाटणार्याचे हात जास्त आहेत. बर्याच ठिकाणी दोन वेळचे भोजन देखील दिले जात आहे पण ग्रामीण भागात अशा कोणत्याच योजना राबविण्यास कोणी पुढाकार घेतल्याचे फारशे दिसून येत नाही. त्यामुळे रोजंदारीने काम करणार्या कुटूंबावर उपासमारिची वेळ आली आहे.
अशात शहरालगत असलेल्या बेसा पावर हाऊस, नरसाळा येथील प्रियाशील माटे, दर्शन अंबिलडुके, प्रतिक धोटे, आल्हाद श्रीवास्कर, देवेंद्र मुंडले, योगेश राऊत, रितेश आंभोरे, अनुराग हरणे, अभिनव श्रीराव, अक्षय धजेकर, पीयूष काळे, प्रवीण वाघमारे, प्रतीक गाढवे, श्रीकांत खंदाडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी जवळपास शंभर ्रगरीब, निराधार व गरजू कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप केले. यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला असल्याच्या भावना या गरजवंतांनी व्यक्त केल्या.