‘ नीट ‘ परिक्षेसाठी आरोग्य मंत्रालयाची गाइडलाइन ; जाणून घ्या अन्यथा ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
JEE Main 2020 नंतर आता NEET परिक्षाची तयारी सुरु झाली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांची परिक्षा केंद्रावर उपस्थिती ते परिक्षागृहामध्ये एण्ट्री कशी असली पाहिजे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाइडलाइन जारी केली आहे.
देशभरात १३ सप्टेंबरपासून NEET परिक्षा सुरु होणार आहे. त्या धर्तीवर परिक्षार्थांना केंद्र सरकारच्या गाइडलाइनबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. करोना विषाणूमुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६वरुन ३,८४३ करण्यात आली आहे. NEET परिक्षासाठी जारी करण्यात आलेल्या गाइडलाइननुसार, परिक्षा केंद्रात विद्यार्थी गेल्यानंतर परिक्षा हॉलपर्यंत जाताना प्रत्येक विद्यार्थांमध्ये सहा फूटाचं अंतर अनिवार्य आहे. परिक्षा केंद्रावर मास्क घालूनच प्रवेश करावा. शिवाय.. साबाणाने हात धुवावेत अन् सॅनिटाझरचा वापर करावा.
दरम्यान, १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मुंबई महानगरात ‘नीट’ची परीक्षा देणारे ४० हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच (हॉल तिकीट) रेल्वेप्रवासाची परवानगी असेल. विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मागील दोन दिवसांत देशात एक लाख ६० हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले आहेत. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचं वातावरण आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी जेईई आणि नीट परिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, सुप्रिम कोर्टानं परिक्षा घेण्यात याव्या असा आदेश दिला. त्यानंर जेईई नंतर आता नीट परिक्षा होणार आहे.